ऋषीपंचमीनिमित्त दगडूशेठ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण
पुणे : ऋषीपंचमीनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे भक्तिमय वातावरणात तब्बल ३५ हजार महिलांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले.
१५ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ६ वाजता या धार्मिक सोहळ्याला सुरुवात झाली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाते.
अथर्वशीर्ष पठणादरम्यान महिलांनी सामूहिक शंखनाद करत बाप्पाची महाआरती केली. हजारो महिलांच्या सामूहिक पठणामुळे मंदिर परिसर भक्तिमय आणि मंगलमय वातावरणाने भारून गेला.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
Views: 45







